आयपीएलचे दुबईतून फिक्सिंग?

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, May 16, 2013 - 14:25

www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग थेट दुबईतून करण्यात आल्याचे पुढे येत आहे. या प्रकरणामुळे क्रिकेट वर्तुळात खबळ उडाली आहे. राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंगप्रकरणात मुंबई आणि दिल्लीतून अटक करण्यात आली. त्यांना बीसीसीआयने खेळाडूंना निलंबित केले आहे.
आयपीएल फिक्सिंग मागे अंडरवर्ल्डचाही हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिल्ली पोलिसांनी तसा संशय व्यक्त केला आहे. फिक्सिंगसाठी दुबईवरुन फोन आल्याची माहिती सूत्रांनी देण्यात येत आहे.
राजस्थान रॉयलच्या एस. श्रीसंतसह दोन खेळांडूना अटक करण्यात आली आहे. एस. श्रीसंतला दिल्लीमधून तर अंकित चव्हाण, अजित चंदेलिया या दोघांना मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी रात्री उशीरा ही कारवाई केली.
या तीन खेळाडूंबरोबरच दिल्ली पोलिसांनी सात बुकींनाही अटक केली. पोलिसांच्या चौकशीत बुकींनी श्रीसंतसह अंकित चव्हाण आणि अजित चंदेलिया यांची नावं घेतली होती. त्याआधारे काल रात्री उशीरा दिल्ली पोलिसांनी तिघांनाही अटक केली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पॉट फिक्सिंग प्रकरणी कडक पाऊले उचललीत. सर्व तीन राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना तात्काळ निलंबित केले आहे. बीसीसीआयचा कारभार स्वच्छ आहे. भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असं बीसीसीआयनं ही कारवाई करताना म्हटलंय. भारतीय क्रिकेट बोर्डाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी रत्नाकर शेट्टी यांनी कारवाईबाबत ही माहिती दिली.
दरम्यान, श्रीसंत याचे करिअर संपविण्यात भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि गोलंदाज हरबजन सिंग या दोघांचा हात आहे, असा आरोप श्रीसंत याच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागण्याची आहे. श्रीसंत याच्या अटकेसाठी महेंद्रसिंग धोनी आणि हरभजन सिंग जबाबदार आहेत. एका वृत्तवाहिनी श्रीशांत याचे वडील बोलत होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.



First Published: Thursday, May 16, 2013 - 14:24


comments powered by Disqus