श्रीशांत-अंकीतसह १८ जणांना जामीन

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, June 10, 2013 - 20:10

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली कोर्टाने आज क्रिकेटर श्रीशांत आणि अंकीत चव्हाणसह १८ जणांना जामीन मंजूर केला आहे.
बुकी आणि श्रीशांतचा मित्र जीजू जनार्दन यालाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
१८ जणांची उद्या तिहार जेलमधून सुटका करण्यात येणार आहे.
या प्रकरणातील रायस्थान रॉयल्सचा खेळाडू अजित चंडिला याने जामीनासाठी अर्ज केला नसल्याने त्याची सुटका होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 10, 2013 - 20:10
comments powered by Disqus