आयपीएल स्पॉटफिक्सिंग: आज आरोपपत्र दाखल?

By Aparna Deshpande | Last Updated: Thursday, September 19, 2013 - 13:06

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणी आज मुंबई पोलीस आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. २१ जणांची नावं आरोपपत्रात असण्याची शक्यता आहे. यात १९ बुकींचा समावेश आहे.

बुकींव्यतिरिक्त पाकिस्तानी अंपायर असद रौफ, चेन्नई सुपरकिंग्जचा टीम प्रिंसिपल गुरूनाथ मयप्पन आणि अभिनेता विंदू दारासिंग यांची नावं यात असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी अंपायर असद रौफवर सामन्यासंबंधीची माहिती विंदूला दिल्याचा आरोप आहे. ही माहिती पुढं गुरूनाथ मयप्पन आणि जयपूर बंधूंना दिली गेल्याची माहिती आहे. रौफला या बदल्यात काही महागड्या भेटवस्तूही मिळाल्याची माहिती आहे.
गुरूनाथ मयप्पनवर विंदूबरोबर बेटींग केल्याचा आरोप आहे. मयप्पन आणि रौफवर फसवणूक आणि सट्टा खेळल्याचा आरोप नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 19, 2013 - 13:03
comments powered by Disqus