`विराट` विजयात माझी सर्वोत्तम खेळी - कोहली

भारतानं काल दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केलाय. टीम इडिंच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो विराट कोहली यांनी. कोहली याच्या विराट खेळीमुळे टीम इंडिला पुन्हा विजय मिळालाय. या सामन्यात आपली सर्वोत्तम खेळी असल्याचे विराटने सांगितले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 5, 2014, 11:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मीरपूर
भारतानं काल दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून धडाक्यात फायनलमध्ये प्रवेश केलाय. टीम इडिंच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो विराट कोहली यांनी. कोहली याच्या विराट खेळीमुळे टीम इंडिला पुन्हा विजय मिळालाय. या सामन्यात आपली सर्वोत्तम खेळी असल्याचे विराटने सांगितले.
सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत विराटने अफ्रिकेच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला. आणि शेवटी चौकार ठोकून विराटने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. सामन्याचे महत्व पाहता, ही माझी सर्वोत्तम खेळी आहे. मी चांगली फलंदाजी केली. याआधी मी चांगला खेळ केला आहे. मात्र, हा सामना आमच्यासाठी खास होता. मी चौकार ठोकले. तसेच महत्वाचे म्हणजे बॅटच्यामध्ये फटके कसे बसतील, त्यावर भर दिला, असे विराट यांने सांगितले.
टी-20 मॅचमध्ये भारतान दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून फायनलमध्ये धडक मारलीय. दक्षिण अफ्रिकेन ठेवलेल्या 173 रन्सचं लक्ष्य टीम इंडियानं 4 विकेट्स गमावून सहज पार केलं. विराट कोहली भारतीय टीमच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं नॉटआऊट 72 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याचबरोबर 4 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स घेणा-या आर. अश्विननंही भारतीय टीमच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अजिंक्य राहणेबरोबर खेळताना विराटनं विजयाचा पाय रचला होता. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाच्या झंझावती खेळानं विजयाचा कळस चढवला. दरम्यान, या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकन टीमनं आपलं चोकर्स हे बिरुद कायम राखलं आहे. आता फायनलमध्ये टीम इंडियाची गाठ पडणार आहे ती श्रीलंकेशी.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.