विराट कोहली घसरला...

भारताचा स्टार बॅटस मॅन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या वनडे बेटींग रॅक ‘नंबर वन’चे सिंहासन गमावले. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स ८७२ गुणांसह अव्वल स्थान काबीज करत कोहलीला दुसर्याव स्थानी ढकलले. भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी डिव्हिलियर्स हा कोहलीपेक्षा १७ रेटिंग गुणांनी पिछाडीवर होता. आता नव्या क्रमवारीत कोहली त्याच्यापेक्षा १३ गुणांनी पिछाडीवर पडला आहे.

Updated: Dec 13, 2013, 02:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताचा स्टार बॅटस मॅन विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या वनडे बेटींग रॅक ‘नंबर वन’चे सिंहासन गमावले. दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्स ८७२ गुणांसह अव्वल स्थान काबीज करत कोहलीला दुसर्याव स्थानी ढकलले. भारत - दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी डिव्हिलियर्स हा कोहलीपेक्षा १७ रेटिंग गुणांनी पिछाडीवर होता. आता नव्या रॅकमध्ये कोहली त्याच्यापेक्षा १३ गुणांनी पिछाडीवर पडला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ०-२ अशी गमावल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी वगळता भारताच्या बहुतांश खेळाडूंना क्रिकेट रॅकमध्ये फटका बसला. तीन सामन्यांची ही मालिका गमावल्याने ‘टीम इंडिया’ला २ रेटिंग गुणांचा फटका बसला, परंतु तरीही धोनी ब्रिगेड १२० गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेला ३ गुणांचा फायदा झाला असून ते ११० गुणांसह पाचव्या स्थानी आहेत.
महेंद्रसिंग धोनी फलंदाजी क्रमवारीत सहाव्या स्थानी कायम असून शिखर धवनची नवव्या स्थानावरून दहाव्या स्थानी घसरण झाली आहे. रोहित शर्माचीही १५व्या स्थानावरून १८व्या स्थानी रवानगी झाली असून गतवेळी १९व्या स्थानी असलेला सुरेश रैना यावेळी पहिल्या २० बॅटस मॅनमधून बाहेर फेकला गेलाय. गोलंदाजी क्रमवारीत रविंदर जाडेजाचीही चार स्थानाने अधोगती झाली असून तो यावेळी सातव्या स्थानावर घसरलाय. रविचंद्रन अश्वि नचीही १४व्या स्थानावरून १७व्या स्थानी घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने दोन सामन्यांत ६ बळी टिपत पाचव्या स्थानावरून दुसर्याा स्थानी झेप घेतली आहे. पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल अव्वल स्थानी कायम आहे.
एबी डिव्हिलियर्स वनडेबरोबरच कसोटी रॅकमध्ये अव्वल बेट्समॅन बनला आहे. अशी कामगिरी करणारा तो दक्षिण आफ्रिकेचा तिसरा तर क्रिकेट जगतातील नववा बॅटस मॅन ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिस व हाशिम अमला यांनी याआधी हा मान मिळविलेला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.