कोलकाता टेस्ट : <b>टीम इंडियाचा एक डाव, ५१ धावांनी दणदणीत विजय</b>

कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडीयाने एक डाव आणि ५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मोहम्मद शमी विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पदार्पणातच घेतल्या ९ विकेट्स घेतल्या. भारताच्या विजयात फलंदाजांची साथ मिळाली. रोहित शर्माची १७७ धावांची झुंझार खेळी, तर अश्वीनच्याही १२४ धावा हे या कसोटीचे वैशिष्ट ठरलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 8, 2013, 11:34 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता
कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडीयाने एक डाव आणि ५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मोहम्मद शमी विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने पदार्पणातच घेतल्या ९ विकेट्स घेतल्या. भारताच्या विजयात फलंदाजांची साथ मिळाली. रोहित शर्माची १७७ धावांची झुंझार खेळी, तर अश्वीनच्याही १२४ धावा हे या कसोटीचे वैशिष्ट ठरलं.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच कोलकाता टेस्टमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय साकारला. १ इनिंग आणि ५१ रन्सने विजय मिळवत धोनी अँड कंपनीने मास्टर-ब्लास्टरला विजयी भेटच दिली. शानदार प्रदर्शन करणा-या रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीसाठी ही टेस्ट ड्रीम डेब्यू ठरली. दुस-या इनिंगमध्ये विंडिजची इनिंग १६८ रन्समध्येच गुंडाळण्यात टीम इंडियाच्या बॉलर्सना यश आल आणि भारताने विजयी सलामी दिली.
विंडिजची इनिंग लवकरात लवकर गुंडाळण्यात भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीने महत्त्वाची भूमिका साकारली. कोलकाता टेस्टमध्ये विजय साकारून सीरिजमध्ये १-० ने आघाडी घेतल्यानंतर वानखेडे टेस्टमध्ये विजय साकारुन सचिन तेंडुलकरला सीरिज विजयाची भेट देण्यास धोनी एँड कंपनी आतूर असतील.
रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीनं कोलकाता टेस्टमध्ये ड्रीम डेब्यू केली. रोहितनं १७७ रन्स केले तर शमीनं मॅचमध्ये एकूण ९ विकेट्स घेतल्या. या दोघांनी आपल्या पदार्पणाच्या मॅचममध्येच चमकदार कामगिरी करत सा-यांचच लक्ष वेधून घेतलं.
दरम्यान, सचिनच्या कोलकातामधील १९९ व्या टेस्टसाठी बेंगॉल क्रिकेट असोसिएशननं सचिनसाठी १९९ बलून आकाशात सोडले. संपूर्ण ईडन गार्डन स्टेडियमवर सचिनमय वातावरण होतं. सगळीकडे सचिन...सचिन... असा नाद घुमत होता.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बंगला क्रिकेट असोसिएनकडून खास सन्मान करण्यात आल्या. कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सचिनला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं आहे. या निमित्तानं सचिनला कोलकातावासियांनी एकप्रकारे कुर्निसातच केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.