मनोज तिवारीचे सुश्मितासोबत सात फेरे

Last Updated: Sunday, July 21, 2013 - 08:39

www.24taas.com,झी मीडिया, कोलकात्ता
मनोज तिवारीने सिक्स मारला आणि त्याचे फिक्स झाले. त्याच्या सिक्सची कमाल पाहून सुश्मिता प्रेमात पडली. हे प्रेम असच पुढे खुलत गेलं आणि मनोजन तिच्यासोबत सात फेरे घेत आपली तिला जीवनसाथी करून घेतले.
भारतीय क्रिकेटर मनोज तिवारीने सुष्मिता रॉयशी विवाह केलाय. हावडा कंट्री क्लबमध्ये त्याने सुश्मितासोबत सात फेरे घेतले. रणजी टीमचा सदस्य असताना त्याची सुश्मिताशी एका मित्रांच्या माध्यमातून ओळख झाली. सुश्मिता त्याला नेहमी मलिंगाच्या चेंडूवर सिक्स मारायला सांगायची. गेल्या आयपीएलमध्ये मनोज तिवारीला सुश्मिताची इच्छा पूर्ण केली.

गेल्या सहा वर्षापासून मनोज आणि सुश्मिता एकमेकांचे मित्र आहेत. मनोजने सिक्स मारताच सुश्मिता त्याच्या प्रेमात पडली. सहा वर्षानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला, अशी माहिती मनोजने दिली. मनोजने आतापर्य़ंत भारताकडून आठ एकदिवसीय आणि तीन टी-२० मॅच खेळलाय. यादरम्यान त्याचे प्रदर्शन होत असताना जो जखमी झाला. वेस्ट इंडिजविरुद्ध १०४ नाबाद धावांची सर्वोत्तम खेळी केली. तसेच तो आय़पीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर या टीमकडूनही खेळलाय. गेल्या चार महिन्यांपासून तो दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, July 19, 2013 - 16:00
comments powered by Disqus