मॅच फिक्सिंगचा इतिहास २०० वर्षांचा!

क्रिकेटमध्ये फिक्सिंग हे काही नवीन नाही... फिक्सिंगची सुरूवात 200 वर्षांपूर्वी तेव्हा झाली जेव्हा क्रिकेटमध्ये तीन ऐवजी केवळ एक स्टम्प वापरला जायचा.. पाहूया हा फिक्सिंगचा इतिहास...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 17, 2013, 07:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटमध्ये फिक्सिंग हे काही नवीन नाही... फिक्सिंगची सुरूवात 200 वर्षांपूर्वी तेव्हा झाली जेव्हा क्रिकेटमध्ये तीन ऐवजी केवळ एक स्टम्प वापरला जायचा.. पाहूया हा फिक्सिंगचा इतिहास...
क्रिकेटचा कोणताही फॉर्म असो... भारतात त्याला जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे... जेव्हा फोर सिक्स लागतात.. तेव्हा कोटी फॅन्स जल्लोष साजरा करतात... मात्र क्रिकेटर्सना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं... त्यांचा देव असतो केवळ पैसा... आपल्यापर्यंत जे क्रिकेट पोहचतं ते सर्व खोटं असतो...
१८१७ला पहिलं मॅच फिक्सिंग
आपला विश्वास नाही बसणार... 196 वर्षांपूर्वी 1817मध्ये ब्रिटीश क्रिकेटर विलियम लॅम्बर्टला फिक्सिंगच्या आरोपाखाली लाईफ टाईम बॅन करण्यात आलं होतं... विलियम लॅम्बर्ट फर्स्ट क्लास क्रिकेटमधील एक नामचीन क्रिकेटर होता... जवळपास 75 वर्षांनंतर 1893मध्ये एका ब्रिटिश अधिका-याने काही अटींवर गावक-यांशी मॅच खेळली आणि त्यातल्या एका खेळाडूशी मॅच पण फिक्स केली... ही स्टोरी फिल्मी वाटत असली तरी खरी आहे...
आसिफ इक्बालवर फिक्सिंगचे आरोप
त्यानंतर अनेक दशकं क्रिकेट मॅच फिक्सिंगचं भूत गायब झालं होतं... 1979मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलकाता टेस्ट खेळवली जाणार होती... तेव्हा भारताचे कॅप्टन होते गुंडप्पा विश्वनाथ आणि पाकिस्तान टीमचे कॅप्टन होते आसिफ इक्बाल... टॉस झाल्यावर आसिफ इक्बालने नाणं उचललं... आणि गुंडप्पा विश्वनाथ यांना भारताने टॉस जिंकल्याचं सांगितलं... त्यानंतर जवळपास दोन दशकांनी सरफराज नवाझ यांनी आसिफ इक्बालवर मॅच फिक्सिंगचे आरोप केले होते...
लिली-मार्शची फिक्सिंग
1981मध्ये ऑस्ट्रेलिय क्रिकेटर्स डेनिस लिली आणि रॉडनी मार्श यांनी आपल्या टीमविरूद्धच सट्टा लगावला होता... इंग्लंडच्या बाजूने 500 वर एक अशी बेट लावली होती... प्रकरण उघड झाल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही...
डिन जोन्सला ऑफर
1992-93मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डिन जोन्सने सांगितलं की श्रीलंका टूरदरम्यान कोण्या एका भारतीयाने त्यांना 50 हजार डॉलर्सची ऑफर दिली होती...
बॉर्डरलाही होती ऑफर
1993साली ऑस्ट्रेलियन खेळाडू ऍलन बॉर्डर यांनी सांगितलं की इंग्लंडविरूद्ध मॅच हरण्याकरता मुश्ताक मोहम्मदने त्यांना 5 लाख पाऊंड्सची ऑफर केली होती..
मनोज प्रभाकरवरही आरोप
1997मध्ये मनोज प्रभाकरने आपल्या सहका-यांवरच श्रीलंकेविरूद्ध पराभवकरता 25 लाख रूपये घेतल्याचे आरोप केले होते... 1998 साली फिक्सिंगची अनेक प्रकरणं उघड झाली...तेव्हापासून आजतागायात हे फिक्सिंगचं भूत उतरलेलं नाही...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.