मोठा खुलासा: मयप्पन-विंदूने केली IPL मॅच फिंक्सिंग

बीसीसीआई अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन आणि विंदू दारा सिंग यांनी आयपीएल मॅच फिक्सिंग केल्याचं उघड झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 21, 2014, 01:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बीसीसीआई अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई मयप्पन आणि विंदू दारा सिंग यांनी आयपीएल मॅच फिक्सिंग केल्याचं उघड झालंय.
`आयपीएल-सीझन ६` सुरु असताना म्हणजेच १२ मे ते १५ मे यादरम्यानचे दोघांचे फोन कॉल पोलिसांनी तपासले. यावेळी मयप्पन आणि विंदू दारा सिंग या दोघांत झालेल्या चर्चेवरुन आयपीएल मॅच फिक्सिंगची सूत्रं या दोघांनीच सांभाळल्याचं समोर आलंय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १२ ते १५ मे दरम्यान आयपीएल-६ च्या जेवढ्या मॅचेस झाल्या त्या सर्व मॅचेसची माहिती मयप्पन विंदू दारा सिंगला पोहचवत होता. त्यानुसार बिंदू दारा सिंग आणि बुकींना माहिती मिळाल्यावर ते सट्टेबाजी सुरू करायचे.
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान मॅचमध्ये मयप्पनने बिंदूला सांगितले की, `चेन्नई या मॅचमध्ये १४० धावा बनवेल` त्याप्रमाणे धोनीच्या टीमने १४१ धावा बनवल्या. मयप्पनच्या बोलण्यानुसार मॅचचा स्कोअर तेव्हढाच किंवा एखाद-दोन धावांनी मागे पुढे होत होता.
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टचे माजी मुख्य न्यायाधीश मुकुल मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांनी सुप्रीम कोर्टला दिलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.