मोहाली कसोटी : चार दिवस मॅच अर्धा तास लवकर

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, March 14, 2013 - 19:12

www.24taas.com,मोहाली
पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियात तिसरा कसोटी सामना झाला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानं उर्वरित चार दिवस मॅच अर्धा तास लवकर म्हणजे सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.
पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियात आजपासून खेळल्या जाणा-या मोहाली टेस्टच्या पहिल्या दिवसाचा खेळ रद्द कऱण्यात आलाय. मोहालीत सकाळपासून पाऊस सुरु होता अम्पायर्सनी दुपारी मैदानाची पाहणी केल्यानंतर खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.

पावसामुळे टॉससुद्धा होवू शकलेला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानं उर्वरित चार दिवस मॅच अर्धा तास लवकर म्हणजे सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया टीममधून चार मोठ्या क्रिकेटपटूंच्या गच्छंतीमुळे स्टिव्ह स्मिथ, नॅथन लिऑन आणि झेव्हियर डोहार्टी यांची टीममध्ये वर्णी लागलीय.

First Published: Thursday, March 14, 2013 - 19:12
comments powered by Disqus