मोहालीत पाऊस, सामन्यावर सावट

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, March 14, 2013 - 12:07

www.24taas.com, मोहाली
सलग दोन कसोटी जिंकलेल्या भारताला तिसरा मोहालीतील सामना जिंकन्याची आशा होती. मात्र, या आशेवर पावसाचे पाणी पडले आहे. मोहालीच्या आकाशात सकाळपासून काळ्या ढगांनी दाटी केली आहे.
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून मोहालीत सुरू होणाऱ्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणला आहे. सकाळपासून पाऊस होत असल्याने मॅच उशीरा सुरू होण्याची शक्यता आहे.
कसोटी मालिकेतील पहिल्या दोन टेस्टमध्ये दणदणीत विजय मिळविलेल्या भारतीय संघाला मोहालीत विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याबद्दल उत्सुकता होती. या आनंदावर पावसाने पाणी फिरवलेय.

आता पाऊस थांबला असला तरी खेळपट्टी सुकविण्यासाठी आणि मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी किमान दोन तास लागण्याची शक्यता होती. मात्र, सामना होणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
दरम्यान, मोहालीतील ढगाळ वातावरण दिवसभर कायम राहणार असून पावसाचीही शक्यता आहे, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे सामन्यावर ढगाळ वातावरण कायम आहे.First Published: Thursday, March 14, 2013 - 12:04


comments powered by Disqus