राजस्थानला हरवत मुंबई इंडियन्स ठरली चॅम्पियन!

मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदाला गवसणी घालत टी-२०मध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विजयी निरोप दिला आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 6, 2013, 11:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या विजेतेपदाला गवसणी घालत टी-२०मध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विजयी निरोप दिला आहे.
फायनलमध्ये मुंबई इंडियन्सनं राजस्थान रॉयल्सवर ३३ रन्सनं विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरलं. मुंबई इंडियन्सच्या २०३ रन्सचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्स १९व्या ओव्हर्समध्ये १६९ रन्सवरच ऑल आऊट झाली आणि मुंबई इंडियन्सनं विजेतेपद पटकावलं.
मुंबईकडून हरभजन सिंगनं ४ तर केरॉन पोलार्डनं ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय ड्वेन स्मिथनं ४४, सचिननं १५, रोहितनं ३३ आणि मॅक्सवेलनं ३७ रन्स केल्या. टी-२० क्रिकेट फॉर्माटमधील सचिन आणि द्रविडची ही अखेरची मॅच ठरली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.