फिक्सिंगनंतर श्रीनिवासन यांचा मीडियावर राग

बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन राजीनामा न देण्याच्या आपल्या भूमिकेवर कायम आहेत. दरम्यान, आज ते मीडियावर चांगलेच घसरलेत. त्यांनी आपला राग व्यक्त केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 27, 2013, 01:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई
बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन राजीनामा न देण्याच्या आपल्या भूमिकेवर कायम आहेत. दरम्यान, आज ते मीडियावर चांगलेच घसरलेत. त्यांनी आपला राग व्यक्त केला.
चेन्नईमध्ये पत्रकारांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते संतप्त झालेत. मला जे काही बोलायचं होतं ते मी कोलकात्यात बोलोलो आहे. पुन्हा मी काहीही बोलणारन नाही, असं सांगत त्यांनी मीडियावर राग काढला.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. बीसीसीआय पदाधिका-यांपैकी माझ्य़ाकडे राजीनामा मागितला नसल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिलंय. सध्याचा काळ हा आपल्यासाठी अतिशय कठीण असल्याचे सांगत पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचं श्रीनिवासन यांनी मान्य केलंय.
आयपीएल हे बीसीसीआयसाठी महत्वाचं असल्याचं सांगत आयपीएलमधल्या गैरप्रकारांची बीसीसीआय पूर्ण चौकशी करणार असल्याचेही त्यानी म्हटलय. दोषींना माफ केलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई कऱणार असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे गुरुनाथ मयप्पन यांच्या नियुक्तीत आपला कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

गेल्या दहा दिवसात पहिल्यादाच कोलकातात प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. श्रीनिवासन यांनी राजीनामा देण्यास नकार दिलाय. आयपीएल हे बीसीसीआयसाठी महत्वाचं असल्याचे सांगत आयपीएलमधल्या गैरप्रकारांची बीसीसीआय पूर्ण चौकशी करणार असल्याचेही त्यानी म्हटलंय. त्याचप्रमाणे आरोप सिद्ध झाल्यास खेळांडूवर कठोर कारवाई करणार असल्याचा पुनरुच्चारही श्रीनिवासन यानी केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.