आयपीएल : श्रीलंकन खेळाडूंना तामिळनाडूत बंदी

चेन्नईत खेळल्या जाणा-या आयपील मॅचेसमध्ये श्रीलंकन खेळाडू खेळू शकणार नाहीत. तसचं चेन्नईतल्या मॅचेसमध्ये श्रीलंकन अंपायरही असणार नाहीत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या विरोधानंतर बीसीसीआयनं हा निर्णय घेतलाय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 27, 2013, 07:31 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
चेन्नईत खेळल्या जाणा-या आयपील मॅचेसमध्ये श्रीलंकन खेळाडू खेळू शकणार नाहीत. तसचं चेन्नईतल्या मॅचेसमध्ये श्रीलंकन अंपायरही असणार नाहीत. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या विरोधानंतर बीसीसीआयनं हा निर्णय घेतलाय.
आयपीएल सामन्यात श्रीलंकन खेळाडू सहभागी होणार असतील, तर त्या मॅचेसना तामिळनाडूत बंदी घालण्यात येईल, या आशयाचं पत्र जयललिता यांनी पंतप्रधानांना पाठवलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयपीलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत श्रीलंकन खेळाडूंना चैन्नईत न उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीलंकेतील तामिळ अत्याचाराविरोधात सध्या तामिळनाडूत वातावरण तापलंय.

या मुद्द्यावरुन डीएमकेनं युपी सरकारचा पाठिंबा काढलेला असतानाच, जयललिता यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून आयपीलमध्ये श्रीलंकन खेळाडूंना विरोध केला. 3 एप्रिलपासून आयपील मॅचेस सुरु होणार असून, यात श्रीलंकेचे 13 खेळाडू सहभागी आहेत.