निवृत्तीचं गुपित सचिन आणि अंजलीलाच ठाऊक

सचिन तेंडुलकरला २००वी कसोटी खेळून बीसीसीआय निवृत्ती स्वीकारयाला सांगणार असे वृत्त होते. परंतु, सचिनच्या निकटच्या सुत्रांनूसार निवृत्तीचा निर्णय अशाप्रकारे घेतला जाणार नाही.

Updated: Oct 1, 2013, 07:30 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
सचिन तेंडुलकरला २००वी कसोटी खेळून बीसीसीआय निवृत्ती स्वीकारयाला सांगणार असे वृत्त होते. परंतु, सचिनच्या निकटच्या सुत्रांनूसार निवृत्तीचा निर्णय अशाप्रकारे घेतला जाणार नाही.
४० वर्षीय हा फलंदाज, राजीनाम्यावरून आरडाओरड करणाऱ्यांना भीक घालत नसल्याचं या सुत्रांनी सांगितले. “तो निवृत्त केव्हा होईल हे फक्त तो आणि अंजली (पत्नी) यांनाच माहिती आहे” असंही या सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
सचिनचा मित्र आणि मुंबई संघातील सहकारी प्रवीण आमरेने म्हटलंय की बोर्ड आणि सचिन दरम्यान सुसंवाद असावा. तेंडुलकरची निवृत्ती ही बाब हाताळण्यासाठी आवश्यक ती काळजी बोर्डाने घेणं गरजेच आहे. मंडळाची काही योजना असणं योग्यच आहे. परंतु सचिनच्या निवृतीचा निर्णय हादेखील सामान्य नाही. कारण तो सामान्य क्रिकेटपटू नाही.
दोन्ही पक्षांनी एकमेकांचे दृष्टीकोन लक्षात घेऊन सर्वांना सुयोग्य मार्ग काढावा. असे प्रवीणने मुंबईच्या आघाडीच्या दैनिकाला सांगितंल.

*इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.