पाकिस्तान क्रिकेट टीमचा झिम्बाव्वे दौरा जाहीर

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, August 6, 2013 - 16:44

www.24tass.com , झी मीडिया, कराची
भारतानं झिम्बाव्वेला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं त्यांचा झिम्बाव्वे दौरा जाहीर केलाय. पाकिस्तानची क्रिकेट टीम दोन टी-२० सामने, तीन वनडे आणि दोन टेस्ट मॅच खेळणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीमचा हा दौरा मागील वर्षी डिसेंबर ते जानेवारी २०१३मध्ये ठरला होता. मात्र तेव्हा तो रद्द करण्यात आला. यापूर्वी २०११साली पाकिस्तान क्रिकेट टीम झिम्बाव्वेच्या दौऱ्यावर गेली होती.
पाक टीमचा कार्यक्रम-
२३ ऑगस्ट – पहिली टी-२० मॅच, हरारे
२४ ऑगस्ट- दुसरी टी-२० मॅच, हरारे
२७ ऑगस्ट – पहिली वन डे मॅच. हरारे
२९ ऑगस्ट – दुसरी वन डे मॅच. हरारे
३१ ऑगस्ट – तीसरी वन डे मॅच. हरारे
१ ते ५ सप्टेंबर – पहिली टेस्ट मॅच, हरारे
१० ते १५ सप्टेंबर – दुसरी टेस्ट मॅच, हरारे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 6, 2013 - 16:43
comments powered by Disqus