टीम इंडियाचा बॉलर पियुष चावला विवाहबद्ध, कार्तिकचा वाङनिश्चय

टीम इंडियाचा बॉलर पियुष चावला लग्नाच्या बेडित अडकला. मेरठ येथील अनुभूती सिंग हिच्याशी त्यांने सात फेरे घेतले. तर दिनेश कार्तिकचा दीपिकाशी साखरपुडा झाला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 30, 2013, 03:09 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
टीम इंडियाचा बॉलर पियुष चावला लग्नाच्या बेडित अडकला. मेरठ येथील अनुभूती सिंग हिच्याशी त्यांने सात फेरे घेतले. तर दिनेश कार्तिकचा दीपिकाशी साखरपुडा झाला.
मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीत पियुष चावला आणि अनुभूती सिंग यांचा विवाह शुक्रवारी मुरादाबाद येथे थाटामाटात झाला. अनुभूती ही सरकारी अधिकारी अमीर सिंग यांची कन्या आहे. या दोघांचा गुरुवारी येथील हॉटेल ड्राइव्ह इन २४ येथे साखरपुडा झाला होता.
दरम्यान, टीम इंडियाचा दुसरा खेळाडून दिनेश कार्तिक याचाही स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लिकलबरोबर शुक्रवारी साखरपुडा झाला. चेन्नईतील हॉटेलमध्ये हा सोहळा थाटात झाला. २२ वर्षीय दीपिका स्क्वॅशच्या जागतिक महिला रँकिंगमध्ये पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळविणारी पहिली भारतीय आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.