पॉन्टिंग टेस्ट क्रिकेटमधूनही होतोय निवृत्त...

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या खराब कामगिरीमुळे त्यानं हा निर्णय घेतलाय.

Updated: Nov 29, 2012, 10:52 AM IST

www.24taas.com, सिडनी
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉन्टिंगनं अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या खराब कामगिरीमुळे त्यानं हा निर्णय घेतलाय.
उद्यापासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पर्थ टेस्टनंतर पॉन्टिंग टेस्ट क्रिकेटला बाय-बाय करणार आहे. या टेस्टनंतर तो टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं लागोपाठ दोन वेळा वर्ल्डकप पटकावलाय. त्यानं आत्तापर्यंत १६७ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. यादरम्यान त्यानं ४१ शतकं ठोकलीत. टेस्ट क्रिकेटमध्ये निवृत्ती स्वीकारल्यानंतरही पॉन्टिंग लीग क्रिकेट मात्र खेळत राहील.
३८ वर्षीय पॉन्टिंगच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर ३९ वर्षीय भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरवर निवृत्तीचा दबाव आणखीनच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.