प्रीती झिंटाला खुलेआम प्रपोज

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, May 14, 2013 - 06:55

www.24taas.com, झी मीडिया, मोहाली
आयपीएल-६ सीजनमध्ये आता कुठे रंगत भरायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सामन्याला गर्दी होत आहे. याच गर्दीतील एकाने प्रीती झिंटाला प्रपोज मारले. प्रीती तू माझ्याशी लग्न करशील का, अशी मागणी केली.
बॉलिवूड अभिनेत्री आणि किंग्ज पंजाबची मालकीन प्रीती झिंटाला खुलेआम एका चाहत्याने प्रपोज मारल्याने प्रीती हैराण झाली. तिकडे सामना सुरू असताना प्रीती आपल्या टीमला प्रोत्साहन करण्यासाठी आली होती. हातातून सामना जाण्याच्या भीतीने प्रीती टेन्शनमध्ये होती. त्यातच लग्नाचं चाहत्याने मागणी घातल्याने ती अधिकच टेन्शनमध्ये आली.

आयपीएल-६ सीजनमध्ये सनराइजर्स आणि पंजाब किंग्जमध्ये सामना होता. या सामन्यात सनराइजर्स टीम पंजाबला भारी पडत होती. त्यामुळे प्रीतीचे टेन्शन वाढत होते. काही जण पंजाबला पाठिंबा देत होते तर काही प्रेक्षक सनराइजर्स टीमला पाठिंबा देत होते. पंजाब टीमला पाठिंबा देणाऱ्या एका उत्साही चाहत्याने एका पोस्टर्सद्वारे प्रीतीलाच मागणी घातली आणि प्रीतीची बोलती बंद केली. यावेळी पंबाज सामना हरला तरी गर्दीचा उत्साह कायम होता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 12, 2013 - 14:45
comments powered by Disqus