रैनाचा `आयपीएल` धमाका रेकॉर्ड्सने सुरू

लागोपाठ दोन मॅच गमावल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सने अखेर विजायाचे खाते उघडले आहे.

Updated: Apr 22, 2014, 05:26 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, अबू धाबी
लागोपाठ दोन मॅच गमावल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्सने अखेर विजायाचे खाते उघडले आहे. अबुधाबीच्या शेख जाएद स्टेडियममध्ये आयपीएलच्या आठव्या मॅचमध्ये चेन्नईनं दिल्लीचा ९३ रन्सने धुव्वा उडवला.
चेन्नईच्या या विजयाचा शिल्पकार सूरेश रैना ठरला. रैनाने ४१ बॉल्समध्ये ५६ रन्स केले. यात ५ चौकार आणि १ सिक्सरचा समावेश आहे. रैनाच्या या खेळीमूळे चेन्नई सुपरकिंग्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना १७७ धावा केल्या. पण या खेळीमुळे रैनाने त्याच्या रेकॉर्डमध्ये एका नवीन रेकॉर्डची नोंद केली आहे.
सुरेश रैना हा `आयपीएल`मध्ये सर्वात जास्त अर्धशतक ठोकणारा खेळाडू ठरला आहे. रैनाने `आयपीएल`मध्ये २० अर्धशतके केली आहेत. जास्त अर्धशतके मारण्यात रैनाने जरी १०१ सामने खेळले असले. तरी कमी सामन्यात जास्त अर्धशतके मारण्याच्या यादीत रैना हा ख्रिस गेल आणि गौतम गंभीर यांच्या पेक्षा मागेच आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.