... आणि राज-शिल्पा शिल्पानं सुटकेचा श्वास सोडला

राजस्थान रॉयल्सचा मालाक राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी मोकळा श्वास घेतलाय. कारण...

शुभांगी पालवे | Updated: Jul 1, 2013, 10:05 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
राजस्थान रॉयल्सचा मालाक राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी मोकळा श्वास घेतलाय. कारण, आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या स्पेशल सेलनं या दोघांनाही क्लिन चिट दिलीय.
चौकशी करणाऱ्या स्पेशल सेलचे आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या सहभागाचे कोणतेही पुरावे हाती न लागल्यानं त्यांना क्लिन चिट दिली गेलीय. त्यामुळे यानंतर दोघांचं नाव या प्रकरणातून वगळण्यात आलंय.

स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात जयपूर पोलिसांना एक पत्र लिहिलंय. यामध्ये राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांच्याबद्दल कळवण्यात आलंय. ज्या मॅचमध्ये सट्टेबाजी झाल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत तो सामना जयपूरमध्ये झाला होता त्यामुळे तिथेच या प्रकरणाची पुढची चौकशी व्हायला हवी, असंही या पत्रामध्ये म्हटलं गेलंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.