९१ बॉल्स २९५ रन्स, ३४ षटकार आणि ११ चौकार

आयर्लंड क्रिकेटमध्ये रविवारी सर्व स्कोरर आणि क्रिकेटचे तज्ज्ञ क्रिकेट रेकॉर्ड बूक शोधण्यात व्यस्त होते. इशं क्रिकेट इतिहासातील अशी मॅच खेळली गेली ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 19, 2014, 08:16 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, आयर्लँड आयर्लंड क्रिकेटमध्ये रविवारी सर्व स्कोरर आणि क्रिकेटचे तज्ज्ञ क्रिकेट रेकॉर्ड बूक शोधण्यात व्यस्त होते. इशं क्रिकेट इतिहासातील अशी मॅच खेळली गेली ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल. ओ नील्स अलस्टर शील्ड क्रिकेट टूर्नामेंटमध्ये ग्लेन्डरमोट आणि क्लीफ्टोंविल्ले दरम्यान झालेल्या ४० ओव्हरच्या मॅचमध्ये ग्लेन्डरमोटच्या रॉय सिल्वानं केवळ ९१ बॉल्सवर नॉटआऊट २९५ रन्स केले. १५ ओव्हरमध्ये बॅटिंग करायला आलेला श्रीलंकेचा क्रिकेटपटू सिल्वानं पहिल्या ४१ बॉल्समध्येच आपली सेंच्युरी केली आणि उरलेल्या अवघ्या २७ बॉल्समध्ये दुसरी सेंच्युरी केली. सिल्वानं आपल्या या विशाल खेळीदरम्यान चौकार आणि षटकरांचा पाऊसच पाडला. त्यानं या खेळीत ३४ षटकार आणि ११ चौकार मारले. याद्वारे त्यानं एकूण २४८ रन्स फक्त बाऊंड्रीद्वारे केले. तर विरुद्ध टीमचा बॉलर डेवी मुन्न याच्या तर एका ओव्हरच्या संपूर्ण ६ बॉल्सवर ६ षटकार लगवले गेले. सिल्वाच्या या खेळीच्या मदतीनं ग्लेन्डरमोटनं ११.५५ रनरेटनुसार ४ विकेट गमावून तब्बल ४६२ रन्सचं टार्गेट ठेवलं. तर क्लीफ्टोंविल्ले टीम ८ विकेट गमावून २२४ रन्सवर ऑलआऊट झाली. मॅचनंतर सिल्वा म्हणाला की, माझ्या १३ वर्षांच्या क्रिकेट करिअरमधली ही सर्वात उत्तम खेळी आहे. मी एक आक्रमक बॅट्समन आहे आणि माझं काम बॉल बाउंड्रीपर्यंत पोहोचवणं आहे. ३०० रन्स न करू शकल्यानं सिल्वा थोडे नाराज दिसले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. * झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.