सचिन जगातला सर्वोत्तम खेळाडू – जयसूर्या

Last Updated: Sunday, December 1, 2013 - 16:59

www.24taas.com, झी मीडिया, तिरुवनंतपुरम
आतापर्यंत आपण पाहिलेल्या खेळाडूंपैकी सचिन तेंडुलकर हा सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचं मत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यान व्यक्त केलंय.
आयपीएलमध्ये सचिनसोबत खेळणं अविस्मरणीय आहे. त्याच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली ही आपल्या करिअरमधील सर्वोत्तम क्षण असल्याचंही जयसूर्या म्हणाला.
दरम्यान एक क्रिकेटपटू म्हणून आपण २० वर्ष श्रीलंकन देशाचं प्रतिनिधित्व केलं आता आपण राजकीय व्यक्तिच्या भूमिकेत आहोत आणि आता राजकारणाद्वारे आपण आपल्या देशाची सेवा करणार आहोत असंही तो म्हणाला.
त्रिवेंद्रम प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जर्नलिस्ट्स प्रिमियर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून जयसूर्या आला होता. “मी आता पर्यंत जेवढे खेळाडू बघितलेत, त्यांच्यापेक्षा सचिन सर्वश्रेष्ठ आहे आणि विश्व क्रिकेटमध्ये देखील तो महान खेळाडू आहे”, असंही जयसूर्या म्हणाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 1, 2013 - 16:59
comments powered by Disqus