संदीप पाटील निवड समितीचे नवे अध्यक्ष

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आज होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीत फेरबदल करण्यात आलेले आहे.

Updated: Sep 27, 2012, 03:49 PM IST

www.24taas.com, मुंबई
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आज होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीत फेरबदल करण्यात आलेले आहे. निवड समितीचे नवे अध्यक्ष संदीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे. कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या टीम इंडियाने भारताकरता दुस-यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली होती...
श्रीकांत यांच्यासह सिलेक्शन कमिटीत असलेले सेंट्रल झोनचे सिलेक्टर नरेंद्र हिरवानी, इस्टर्न झोनचे सिलेक्टर राजा व्यंकट आणि वेस्टर्न झोनचे सिलेक्टर सुरेंद्र भावे यांचा कार्यकाळ संपला होता... तर सध्या सिलेक्शन कमिटीतील मोहिंदर अमरनाथ यांना कमिटीत येऊन केवळ एकच वर्ष झाले मात्र त्यांना निवड समितीतून वगळण्यात आलेले आहे.
संदीप पाटील निवड समितीचे नवे अध्यक्ष, तर साबा करीम, विक्रम राठोड, रॉजर बिन्नी, राजिंदरसिंग हंसही यांचीही निवड समितीत वर्णी लागलेली आहे.

निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांची कारकिर्द
1) भारतीय निवड समितीचे नवे अध्यक्ष

2)1983 वर्ल्ड कप विजयाता मोलाचा वाटा

3) भारतीय टीमचेही होते प्रशिक्षक

4) भारतीय टीमचे तडाखेबंद मिडल ऑर्डर बॅट्समन

5) इंग्लिश बॉलर बॉब विलिसला सलग सहा फोर ठोकण्याचा विक्रम

6) केनियनं टीमचे माजी कोच (त्यांच्या मार्गदर्शनात केनियाची 2003 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये धडक )

7) 2009पासून नॅशनल क्रिकेट ऍकेडमीचे डायरेक्टर