शाहिद आफ्रिदीचा वन डेत वर्ल्ड रेकॉर्ड!

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, July 15, 2013 - 20:46

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पाकिस्तानचा ऑलराउंडर शाहिद आफ्रिदीने एकदिवसीय सामन्यात काल नवा रेकॉर्ड बनवला. त्याने काल सुरूवातीला जोरदार फलंदाजी केली तर गोलंदाजी करताना ३५० पेक्षा अधिक विकेट घेतल्या. अशा प्रकारे कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे.
आफ्रिदीने काल वेस्ट इंडिज विरोधात जॉर्ज टाऊनमध्ये खेळताना हा विक्रम केला आहे. आफ्रिदीने सुरूवातील फलंदाजी करताना शानदार ७६ धावा काढल्या. तर नंतर गोलंदाजी करताना १२ धावा देऊन ७ विकेट पटकावण्याची जबरदस्त कामगिरी केली. या दरम्यान त्याने ३५० विकेटचा पल्ला ओलांडला. या शानदार प्रदर्शनानंतर त्याच्या नावावर ३५५ वन डे सामन्यात ७२७७ धावा आणि ३५५ विकेटचा विक्रम नोंदविण्यात आला.
ड्वेन ब्राव्होला बाद करून त्याने आपली ३५० वी विकेट घेतली. आफ्रिदीनंतर सनथ जयसूर्या याने ७००० पेक्षा अधिक रन्स आणि ३०० पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. वन डे सामन्यात ३५० पेक्षा अधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत आफ्रिदी आठवा आणि पाकचा तिसरा गोलंदाज आहे. यापूर्वी वसीम अक्रमने ५०२ आणि वकास युनूस याने ४१६ विकेट घेतल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 15, 2013 - 20:46
comments powered by Disqus