`तो` टीममध्ये असेपर्यंत टीम इंडियाचा पराभव - गावस्कर

Last Updated: Tuesday, March 11, 2014 - 10:19

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या पराभवावर इशारा दिला आहे.
टीममधून एका व्यक्तीला दूर केल्याशिवाय टीमवरील पराभवाचं सावट दूर होणार नाही, असं गावस्करांनी एका वृत्तपत्रातील लेखात म्हटलं आहे. तसेच राहुल द्रविड सारख्या युवा कोचची टीम इंडियाला गरज असल्याचं लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.
सुनील गावस्कर यांनी आपल्या लेखात मोठ्या प्रमाणात टीमचे कोच डंकन क्लेचर यांच्यावर टीका केली आहे.
पराभवाचं मोठं कारण डंकन फ्लेचर असल्याचं सुनील गावस्करांनी म्हटलं आहे. तसेच डंकन फ्लेचर यांना हॉवण्यात आलं नाही तर टीमच्या पराभवाची मालिका सुरूच राहिल.
सुनील गावस्कर यांच्या मते टीमला एका युवा कोचची गरज आहे. यावरून गावस्करांनी ऑस्ट्रेलियन टीमचा सध्याचा कोच डॅरेन लेहमॅनचही उदाहरण दिलं.
लेहमेन आल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम पुन्हा ट्रॅकवर आल्याचं गावस्करांनी म्हटलं आहे. डंकन फ्लेचर हे कोच म्हणून आल्यानंतर परदेशी दौऱ्यात टीम इंडियाचं प्रदर्शन खराब झालं असून, पराभवातही वाढ झाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 11, 2014 - 10:19
comments powered by Disqus