रैना-जाडेजा मैदानावरच एकमेकांना भिडलेत

पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज मॅचदरम्यान टीम इंडियाचे यंगस्टर्स रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैना आपापसांतच पिचवर एकमेकांना भिडले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 6, 2013, 08:33 AM IST

www.24taas.com,झी मीडिया,पोर्ट ऑफ स्पेन
ट्राय सिरिजमध्ये भारताची अवस्था ‘करो या मरो’ची असताना टीममध्ये टसल पाहायला मिळाली. कॅच सुटली अन् रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैना एकमेकांना भिडलेत. वाद विकोपाला जाण्यापासून अन्य खेळाडूंनी मध्यस्ती केली.
जंटलमन्स गेम अशी ओळख असणा-या क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण अनेकदा प्रतिस्पर्धी टीम्समधील क्रिकेटर्सना आपापसात भिडताना पाहिलं असेलच... मात्र एकाच टीममधील खेळाडू एकमेकांना भिडतानाचं दृश्य तसं निराळं. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये झालेल्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज मॅचदरम्यान टीम इंडियाचे यंगस्टर्स रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैना आपापसांतच पिचवर एकमेकांना भिडले.

रवींद्र जाडेजाच्या बॉलिंगवर रैनाने दोन कॅच सोडल्यानंतर सर रवींद्र जाडेजाचा राग उफाळून आला... रैनाने आधी स्लिपमध्ये केमार रॉच आणि त्यानंतर डीप मिडविकेटला सुनिल नरेनचा कॅच सोडल्यानंतर जाडेजाचा राग अनावर झाला... आणि सुरू झाली भर मैदानात तु तू मै मै... अखेर कॅप्टन विराट कोहली आणि ईशांत शर्मा यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे हा वाद निवळला.
# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.