टीम इंडिया फायनलमध्ये, होणार पावसाची मदत

Last Updated: Friday, April 4, 2014 - 10:36

www.zee24taas.com, झी मीडिया, मीरपूर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या सेमी फायनल होणार आहे. मात्र जर शुक्रवारी पाऊस पडला, तर भारत फायनलमध्ये पोहोचेल. शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
ढाक्यातील हवामानाचा अंदाज घेता 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलीय. भारत आणि दक्षिण आफ्रिकामध्ये होणाऱ्या दुसऱ्या सेंमीफाइनलमध्ये हवामान खराब होऊ शकते.
त्यामुळे खेळ्याच्या नियमानुसार, सामन्या दरम्यान पाऊस पडला आणि दोन्ही संघ पाच-पाच ओव्हर खेळू शकले नाही. तर त्यांच्या खेळातील सर्वाधिक क्रमांकावर असलेला संघ विजेता म्हणून घोषित केला जाईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 4, 2014 - 10:36
comments powered by Disqus