टीम इंडीयाचे लकी नंबर टी-शर्ट

वन-डे क्रिकेट विश्वात सर्वच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स आपापल्या आवडीच्या नंबरचा टी-शर्ट घातलेला आपण पाहिलं असेलच...

Updated: Aug 3, 2013, 05:59 PM IST

www.24taas.com झी मीडिया, मुंबई
वन-डे क्रिकेट विश्वात सर्वच आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्स आपापल्या आवडीच्या नंबरचा टी-शर्ट घातलेला आपण पाहिलं असेलच. मात्र आपण हे कधीच ऐकलं नसेल की एकाच नंबरकरता दोन क्रिकेटर्समध्ये वाद उद्भवले असतील. पण असं घडलं आहे आणि तेही टीम इंडियाचे दोन स्पिनर्स अमित मिश्रा आणि आर. अश्विन यांच्यात...दोघांनाही लकी ठरलेल्या 99 नंबरचं टी-शर्ट घालून मैदानात उतरायचं आहे.
टीम इंडियाच्या या दोन अव्वल स्पिनर्समध्ये प्रतिस्पर्धी बॅट्समन्सना आऊट करण्याकरता नाही. तर एकमेकांवर कुरघोडी करत आघाडी घेण्यासाठी चुरस रंगली आहे आणि ही चुरस आहे ती 99 क्रमांकाच्या टी-शर्टकरता...
अमित मिश्रा आणि आर. अश्विन या दोन्ही स्पिनर्सचा आवडता क्रमांक99 हा आहे. हे दोन्ही क्रिकेटर्स या क्रमांकाला आपल्याकरता लकी मानतात. सध्याच्या झिम्बाब्वे दौ-यात लेग स्पिनर अमित मिश्रा 99 क्रमांकाच्या टी-शर्टसह मैदान गाजवतोय.
तर दुसरीकडे सध्या भारतात विश्रांती घेत असलेल्या अश्विनचाही आवडता क्रमांक 99 आहे. अश्विनने 99 क्रमांकाचं टी-शर्ट घालूनच मैदानात आतापर्यंत भेदक बॉलिंग केली आहे. त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करून भारताच्या विजयात हातभार लावला आहे. त्यामुळे आता लढाई आहे ती या करताच की जर या दोन्ही खेळाडूंना एकाचवेळी खेळण्याकरता मैदानात उतरावं लागलं तर कोण 99 क्रमांकाचं टी-शर्ट घालून मैदानात उतरेल?
कारण नियमांनूसार मैदानात उपस्थित प्रत्येक क्रिकेटरला वेगवेगळा क्रमांक टी-शर्टवर ठेवावा लागतो. आणि जर दोन्ही क्रिकेटर्सना एकाच क्रमांकाचा टी-शर्ट पाहिजे असल्यास जो क्रिकेटर जास्त मॅचेस खेळला आहे त्यालाच हव्या असलेल्या क्रमांकाचा टी-शर्ट दिला जातो...

अमित मिश्राच्या बाबतीत प्रॉब्लेम एकच आहे की त्याने जरी अश्विनच्या आधी वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं असलं तरी अश्विन त्यापेक्षा जास्त वन-डे खेळला आहे. त्यामुळे 99 क्रमांकाच्या टी-शर्टवर पहिला हक्क आहे तो अश्विनचाच... त्यामुळे अमितला 99 क्रमांकाच्या टी-शर्टवर आपला हक्क सिद्ध करण्याकरता अश्विनपेक्षा बरीच धमाकेदार कामगिरी करावी लागले. तरंच अश्विनचा 99 क्रमांक अमित मिश्राला मिळवता येईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.