इंग्लंड सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा

इंग्लंडविरुद्धच्या तीन वन-डे मॅचेसाठी टीम इंडियाची दिल्लीमध्ये घोषणा करण्यात आली. वीरेंद्र सेहवागला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. गेल्या काही मॅचेसमध्ये त्याला काही केल्या फॉर्म गवसत नसल्यानेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

जयवंत पाटील | Updated: Jan 6, 2013, 09:20 PM IST

www.24taas.com, मुंबई
इंग्लंडविरुद्धच्या तीन वन-डे मॅचेसाठी टीम इंडियाची दिल्लीमध्ये घोषणा करण्यात आली. वीरेंद्र सेहवागला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. गेल्या काही मॅचेसमध्ये त्याला काही केल्या फॉर्म गवसत नसल्यानेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
वीरूऐवजी टेस्टमध्ये शानदार कामगिरी करणा-या चेतेश्वर पुजाराला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे. अमित मिश्रानेही भारतीय टीममध्ये कमबॅक केलं आहे. तर गौतम गंभीरवर सिलेक्श कमिटीने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. परविंद अवानालाही टीम इंडियामधून वगळण्य़ात आलं आहे.
दरम्यान, टीम इंडियाने पाकिस्ता‍नला १५७ धावांवर गारद करून 10 धावांनी रोमांचक विजय मिळवला. त्यामुळे भारताने व्हाइईटवॉश टाळला