धोनीच्या घरी टीम इंडियाची पार्टी

Last Updated: Thursday, January 17, 2013 - 17:19

www.24taas.com, रांची
टीम इंडियाने दुसरी वनडे जिंकून भारत-इंग्लंडच्या या सीरिजमध्ये बरोबरी साधल्याने क्रिकेटरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आणि त्यातच कॅप्टन कूल धोनीच्या होम ग्रांऊडवर म्हणजेच रांचीमध्ये पुढील सामना असल्याने धोनीचे चाहते तर भलतेच उत्साहात आहेत. तिस-या वनडे सामन्यासाठी दोन्ही संघ रांचीत काल सायंकाळी दाखल झाले आहेत. आज सकाळपासून दोन्ही संघातील खेळाडू नेट प्रॅक्टिस करीत आहेत.
काल टीम इंडियाचे रांचीत आगमन झाल्यानंतर धोनी एअरपोर्टवरून थेट घरीच गेला. तेथे त्याने टीम इंडियाला शानदार पार्टी दिली. ही पार्टी चार तासांपेक्षा जास्त चालली. रात्र जास्त झाल्याने सुरेश रैना धोनीच्या घरीच थांबला.

दरम्यान, त्याआधी झारखंडची राजधानी रांचीत क्रिकेटरसिकांकडून टीम इंडियाचे जबरदस्‍त स्‍वागत करण्यात आले. त्यामुळे तिसरी वनडे जिंकून धोनी घरच्या प्रेक्षकांना भेट देणार का?

First Published: Thursday, January 17, 2013 - 17:11
comments powered by Disqus