आयसीसी `वर्ल्डकप टी-२०`साठी भारतीय संघ सज्ज

Last Updated: Tuesday, March 11, 2014 - 15:00

www.zee24taas.com, झी मीडीया, मुंबई
बांग्लादेशमध्ये आशिया चषक स्पर्धेत भारताला हार पत्करावी लागली. मात्र आता भारतीय टीमचं लक्ष बांग्लादेशमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टी -20 स्पर्धाचं आहे. १६ मार्चपासून आयसीसी वर्ल्ड टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टी-२० साठी १४ मार्चला धोनीच्या नेतृत्वाखाली रवाना होणार आहे. २००७मध्ये आयसीसी वर्ल्ड टी-२० भारतानं आपला कट्टर शत्रू पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात विजेते पद पटकावले होते.
कर्णधार धोनी शारिरीक दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेला गेला नव्हता. मात्र धोनीला १७ मार्चला श्रीलंकाविरुद्ध आणि १९ मार्चला इंग्लडविरुद्ध होणाऱ्या सामने खेळावे लागतील. किक्रेट सूत्रांनुसार, धोनी आणि अंडर फायर प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी मीडियाला कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही आहे. `ढाकाला पोहचल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करणार असल्याचे` बीसीसीआई सूत्रांकडून समजतयं.
भारतीय संघ : महेंद्रसिंग ढोणी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्र अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शम्मी, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, मोहित शर्मा आणि वरुण आरोन .

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 11, 2014 - 15:00
comments powered by Disqus