टीम इंडियाची इनिंग गडगडली

बंगळुरूच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया संकटात सापडली असताना विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने शतकी पार्टनरशिप करत भारताला तीनशेपारचा आकडा गाठून दिला. मात्र टीम साऊथीच्या भेदक मा-यापुढे भारतीय बॅट्समन्सनी नांगी टाकल्याने, न्यूझीलंडला भारताविरूद्ध 12 रन्सची आघाडी घेण्यात यश आलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 2, 2012, 12:06 PM IST

www.24taas.com, बंगळुरू
बंगळुरूच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया संकटात सापडली असताना विराट कोहली आणि कॅप्टन महेंद्र सिंग धोनीने शतकी पार्टनरशिप करत भारताला तीनशेपारचा आकडा गाठून दिला. मात्र टीम साऊथीच्या भेदक मा-यापुढे भारतीय बॅट्समन्सनी नांगी टाकल्याने, न्यूझीलंडला भारताविरूद्ध 12 रन्सची आघाडी घेण्यात यश आलं.
पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडने रॉस टेलरच्या शतकी खेळीच्या जोरावर उभारलेल्या 365 रन्सचा पाठलाग करताना भारताची पहिली इनिंग 353 रन्सवरच गडगडली. दुस-या दिवशी भारताच्या 80 रन्सवर 4 विकेट गमावल्यानंतर आधी रैना-कोहली आणि नंतर कोहली-धोनीने भारताची इनिंग सांभाळत भारताला सुस्थितीत नेऊन ठेवलं. मात्र तिस-या दिवसाच्या पहिल्या सत्रात किवींनी नवीन बॉल घेतल्यानंतर भारतीय बॅट्समन्सची त्रेधा उडाली... दरम्यान विराट कोहलीने आपल्या झुंझार खेळीचं प्रदर्शन करताना टेस्ट करिअरमधील दुसरी सेंच्युरी पुर्ण केली. विराटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध टेस्टमधील पहिली सेंच्युरी झळकावली होती. विराटच्या या दमदार सेंच्युरीत 14 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता... तर दुस-या एंडकडून खेळताना कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनीनेही 26वी हाफ सेंच्युरी पूर्ण केली.

विराट-धोनी जोडीने सहाव्या विकेटसाठी 122 रन्सची पार्टनरशिप करताना भारताला बंगळुरू टेस्टमध्ये कमबॅक करून दिलं. मात्र सेंच्युरी पुर्ण केल्यानंतर कोहलीला 103 रन्सवर एलबीडब्ल्यू करत टीम साऊथीने भारताला सहावा धक्का दिला... त्यानंतर लगेचच साऊथीने पुढल्या ओव्हरमध्ये तुफानी बॅटिंग करणा-या कॅप्टन माहीला 62 रन्सवर एलबीडब्ल्यू करत भारताला सातवा धक्का दिला. त्यानंतर आलेला झहीर खान आणि प्रग्यान ओझाही साऊथीचे शिकार ठरले. साऊथीच्या या भेदक मा-यामुळे भारताची 9 आऊट 320 अशी स्थिती झाली होती. न्यूझीलंड पहिल्या इनिंगमध्ये मोठी आघाडी घेणार असं वाटत असताना. आर. अश्विनने टेलएंडर बॅट्समन उमेश यादवच्या साथीत 10व्या विकेटसाठी 33 रन्सची पार्टनरशिप करताना भारताला साडेतीनशे रन्सचा टप्पा पार करून दिला. अखेर बाऊल्टने उमेशला 4 रन्सवर बोल्ड करत भारताच्या पहिल्या इनिंगला 353 रन्सवर पुर्ण विराम दिला आणि किवींनी पहिल्या इनिंगमध्ये भारतावर माफक 12 रन्सची आघाडी घेतली.