टीम इंडिया टेस्ट रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर...

Last Updated: Tuesday, March 26, 2013 - 15:54

www.24taas.com, दुबई
भारताला आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागणार आहे. कारण की, इंग्लडने ऑकलंडमध्ये आज न्यूझीलंड सोबत झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्ट मॅचला ड्रॉ करण्यात यश मिळालं आहे. आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्या स्थानावर कायम राहता आलं.
भारताला दुसऱ्या स्थानासाठी दिल्ली टेस्ट जिंकणं महत्त्वाचं होतंचं... मात्र त्याचबरोबर न्यूजीलंडने इंग्लंडला हरवणंही महत्त्वाचं होतं. जर न्यूझीलंडने ही सीरीज १-० ने जिंकली असती तर भारताला रँकिंगमध्ये दुसरं स्थान मिळालं असतं आणि त्याच सोबत ३ लाख ५० हजार डॉलर देखील मिळाले असते.
इंडिया तिसऱ्या क्रमांवर गेल्याने टीम इंडियाला २ लाख ५० हजार डॉलरवरच समाधान मानावं लागलं. तर ऑस्ट्रेलियाला १ लाख ५० हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळाले. इंडियाने ऑस्ट्रेलियाला ४-० ने मात देत एकूण ११२ गुणांची कमाई केली. तर १२८ गुणांसोबत दक्षिण आफ्रिका ही पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांना ४ लाख ५० हजार डॉलर देण्यात आले.

First Published: Tuesday, March 26, 2013 - 15:54
comments powered by Disqus