टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर विजय

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, June 12, 2013 - 08:15

www.24taas.com, झी मीडिया, लंडन
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमधील आपल स्थान निश्चित केलय. शिखर धवन आणि रवींद्र जाडेजा पुन्हा एकदा विजायाचे शिल्पकार ठरले. धवनने पुन्हा एकदा तडाखेबंद सेंच्युरी झळकावली. तर जाडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने पुन्हा एकदा तडाखेबंद सेंच्युरी झळकावली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धवनने धमाकेदार 114 रन्सची इनिंग खेळली होती तर आता विंडिजविरुद्धही त्याने 102 रन्सची नॉट आऊट इनिंग खेळली.
`मिशन चॅम्पियन्स ट्रॉफी`मधील पहिली मोहिम धोनी एँड ब्रिगेडने फत्ते केलीय. टी-20वर्ल्ड कप विजेत्या वेस्ट इंडिजला पराभूत करत टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाचा गब्बर शिखर धवन पुन्हा एकदा विजयाचा शिल्पकार ठरला. 41 व्या रन्सवर जीवदान मिळालेल्या धवनने रन्सची धडाकेबाज इनिंग साकारली. दक्षिण आफ्रिकेच्या 234 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना धवन आणि रोहितने पुन्हा एकदा 101 रन्सची शानदार ओपनिंग दिली. रोहितने दमदार हाफ सेंच्युरी झळकावली. रोहित 52 आणि कोहली 22 रन्सवर आऊट झाल्यावर दिनेश कार्तिकने धवनला चांगली साथ दिली.
तत्पूर्वी विंडिजला 233 रन्सवर रोखण्यात `सर` रवींद्र जाडेजाने पुन्हा एकदा महत्वाची भूमिका साकारली. जाडेजाने आपल्या फिरकीत 5 विंडिज बॅट्समनला अडकवले. तर अश्विन, ईशांत, उमेश आणि भुवनेश्वरला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. सलग दोन विजयानंतर सेमी फायनलमध्ये टीम इंडिया धडक जरी मारली असली तरी आता टीम इंडियाचा आगामी मुकाबला 15 जूनला पारंपारिक पाकिस्तानशी होणार आहे. यामुळे आता भारतीय क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा असणार आहे ती हाय व्हॉल्टेज मुकाबल्याची

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 11, 2013 - 23:13
comments powered by Disqus