टीम इंडियाचा दणदणीत विजय

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, August 1, 2013 - 19:16

www.24taas.com, झी मीडिया, बुलावयो
टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्धच्या चौथ्या वन-डेमध्ये 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय. झिम्बाब्वेच्या 145 रन्सच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने 31व्या ओव्हर्समध्येच हे आव्हान पार करत विजय साकारलाय.
भारताकडून रोहित शर्मा आणि सुरेश रैना या दोघांनीही हाफ सेंच्युरी झळकावली. तर अमित मिश्राने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
या विजयामुळे पाच वन-डेच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 4-0ने आघाडी घेतली आहे. पदार्पणातच दोन विकेट्स घेणारा मोहित शर्मा `प्लेअर ऑफ द मॅच`चा मानकरी ठरला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 1, 2013 - 19:16
comments powered by Disqus