पॉन्टिंगची दमदार हाफ सेंचुरी

मेलबर्न येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिल्या टेस्टमध्ये आज रिकी पॉन्टिंगने ६७ बॉल्समध्ये दमदार हाफ सेंचुरी केली आहे ४६ धावांवर २ आऊट अशी आज खेळाला सुरूवात झाली होती. कोवेनचीही अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे.

Updated: Dec 26, 2011, 09:27 AM IST

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न

मेलबर्न येथे सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलियामधील पहिल्या टेस्टमध्ये आज रिकी पॉन्टिंगने ६७ बॉल्समध्ये दमदार हाफ सेंचुरी केली आहे   ४६ धावांवर २ आऊट अशी आज खेळाला सुरूवात झाली होती. कोवेनचीही अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे.

मेलर्बन टेस्टमध्ये काल ऑस्ट्रेलियानं लंचपर्यंत २ विकेट्स गमावून २६ रन्सपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पावसाचा व्यत्यय आला आणि खेळ थांबवण्यात आला होता. दरम्यान, आश्वासक सुरुवातीनंतर कांगारुंनी दोन विकेट्स झटपट गमावल्या. डेव्हिड वॉर्नर ३७ रन्वर उमेश यादवच्या बॉलिंगवर आऊट झाला. त्यानंतर लगेचच शॉर्न मार्श शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. उमेश यादवनचं त्याची विकेट घेतली. आणि कांगारुंची अवस्था २ आऊट ४६ रन्स अशी करुन टाकली.

त्यानंतर कोवेन आणि अनुभवी रिकी पॉन्टिंगनं आणखी पडझड होऊ न देता कांगारुंची इनिंग सावरली.

लाईव्ह स्कोर पाहाण्याठी क्लिक करा- http://zeenews.india.com/sports/scorecard.aspx?cbzmid=10711&cbzpage=scorecard#scorecard