रोमहर्षक सामान्यात कांगारूंचा लंकेवर विजय! - Marathi News 24taas.com

रोमहर्षक सामान्यात कांगारूंचा लंकेवर विजय!

www24taas.com, पर्थ
 
 
ऑस्ट्रेलियानं रोमहर्षक लढतीत श्रीलंकेचा 5 रन्सनं पराभव केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या मॅचमध्ये अखेर कांगारूंनी बाजी मारली.
 
ऍन्जेलो मॅथ्यूज आणि धम्मिका प्रसादनं दहाव्या विकेटसाठी 46 रन्सची पार्टनरशिप केली. मॅथअयूजनं 64 रन्सची झुंजार इनिंग खेळली. मात्र त्याला लंकेला विजय़ मिळवून देता आला नाही. लंकेची टीम 226 रन्सवर ऑलआऊट झाली.
 
 
ऑस्ट्रेलियाने सुरूवातील फलंदाजी करत सर्वबाद २३१ धावा केल्या होत्या. कर्णधार मायकल क्लार्कने सर्वाधिक ५७ धावा केल्या. त्यात त्याच्या चार चौकारांचा समावेश आहे.
 
श्रीलंकेकडून मलिंगा, कुलशेखरा, मॅथ्यूज, प्रसाद आणि सेनानायके यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
 

First Published: Friday, February 10, 2012, 19:36


comments powered by Disqus