ऑसींची सावध सुरवात, भारत करणार का मात?

भारत वि. ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये ऑस्टेलियाने प्रथम बॅटींग करत अगदी सावध सुरवात केली आहे. याआधीच्या भारताविरूद्धच्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाने ऑसींना लोळवले होते.

Updated: Feb 19, 2012, 05:09 PM IST

www.24taas.com, ब्रिस्बेन

 

भारत वि. ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये ऑस्टेलियाने प्रथम बॅटींग करत अगदी सावध सुरवात केली आहे. याआधीच्या भारताविरूद्धच्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाने ऑसींना लोळवले होते, त्यामुळे टीम इंडियाला निर्धाराने तोंड देण्यासाठी ऑसी बॅट्समनने मंद पण आश्वासक अशी सुरवात केली.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

तरीही भारतीय बॉलर त्यांच्या दोन महत्त्वाच्या विकेट घेण्यात यशस्वी झाले आहेत. घातक डेव्हीड वॉर्नरला इरफान पठाणने तेंडुलकर करवी बाद केले तर पॉण्टिंगला झहीर खानने आऊट केले. वॉर्नर ४३ तर पॉण्टिंग ७ रन करून तंबूत परतले

 

ऑस्टेलियात सुरू असलेल्या सीबी ट्राय सीरीजमध्ये आज ब्रिस्बेन येथे भारताची पाचवी वन डे ऑस्टेलिया सोबत सुरू झाली आहे. या सीरीजमधला ऑस्टेलियासोबत ही तिसरी वन डे आहे. ऑस्ट्रेलियाने आज प्रथम टॉस जिंकून बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

ऑस्टेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्क हा दुखापतीमुळे या मॅचला मुकल्याने ऑस्टेलियाचे नेतृत्व पॉण्टिंग करणार आहे. गेल्या तीन वन डे मध्ये इंडिया कम बॅक करत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांना चांगलीच धूळ चारली. त्यामुळे गेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज असणार आहे. तर भारत सुद्धा ऑसींना आस्मान दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

 

आजच्या पाचव्या वन डे मध्ये टीम इंडियाने एकमेव बदल केलेला आहे. आर. आश्विन ऐवजी झहीर खानला संधी देण्यात आली आहे. तर या वन डे साठी सुद्धा सेहवागला बाहेरचाच रस्ता दाखवण्यात आला आहे. पण आता सगळ्याचं लक्ष सचिनचा महाशतकाकडे लागून राहिलं आहे. त्यामुळे सचिन आज तरी आपलं महाशतक पूर्ण करेल अशीच सगळ्यांची आशा आहे.

 

ऑस्ट्रेलिया :  97/2 (ओव्हर 24.0)

इंडिया : 0/0 (ओव्हर 0.0)