वीरूचा राग 'भारी', BCCI म्हणे बस 'घरी'

वीरेंद्र सेहवाग बीसीसीआयशी नडला म्हणूनच त्याची एशिया कपच्या टीममधून सुट्टी करण्यात आल्याची चर्चा आहे. वीरु-धोनीचे मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर बीसीसीआयनं दोघांना एकत्र मीडियासमोर प्रेसकॉफरन्स करण्यास सांगितलं होतं.

Updated: Mar 1, 2012, 01:34 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

वीरेंद्र सेहवाग बीसीसीआयशी नडला म्हणूनच त्याची एशिया कपच्या टीममधून सुट्टी करण्यात आल्याची चर्चा आहे. वीरु-धोनीचे मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर बीसीसीआयनं दोघांना एकत्र मीडियासमोर प्रेसकॉफरन्स करण्यास सांगितलं होतं. मात्र तसं काही झालं नाही. अनफिट असल्यानं वीरू टीमबाहेर असल्याचं कारण निवड समितीनं दिलं आहे.

 

मात्र वीरूला टीममधून बाहेर काढण्याचं कारण काही वेगळचं असल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु आहे. बीसीसीआयचा आदेश धुडकावल्यानं वीरूची टीममधून सुट्टी करण्यात आली आहे. वीरू-धोनीचे  मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर बीसीसीआयनं दोघांना एकत्र मीडियासमोर येण्याचे आदेश दिले होते. मात्र बीसीसीआयचा फतवा वीरुनं धुडकावला. आणि टीममधील वादाला बातम्यांना दुजोराच मिळाला.

 

अशा हेकेखोर वागण्यामुळे बीसीसीआय वीरूवर उखडली. बीसीसीआयचे बीग बॉस त्याच्यावर संतापले. आणि त्यामुळेच  वीरूला एशिया कपच्या टीममधून डच्चू देण्यात आल्याचं बोललं जातं आहे. वीरू बीसीसीआयशी नडल्यामुळे त्याला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यातं आला आहे. तर काल निवड समितीचे अध्यक्ष के. श्रीकांत हे देखील सेहवागला बाहेर का ठेवले जात आहे? या प्रश्नावर चिडले होते.