महाशतकः क्रिकेटचा दिवाळी, दसरा, पाडवा साजरा

टॉस जिंकून प्रथम बॅटींगसाठी आलेल्या इंडियन टीमची सुरवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. गंभीर जो गेल्या मॅचचा हिरो ठरला होता, तो या मॅचमध्ये जास्त चमकदार कामगिरी करु शकला नाही.

Updated: Mar 16, 2012, 05:36 PM IST

www.24taas.com, मीरपूर

 

सचिनने अखेर करून दाखवले, हो सचिनने करूनच दाखवले, अनेक दिवसांपासून भारतातील क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण आज आला. सचिनने अखेर महाशतक . गेल्या ३३ इनिंगच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सचिनने आज बांग्लादेश विरूद्ध महाशतक ठोकले.. महाशतक आजवर कोणीही न गाठलेला एक पल्ला सचिनने गाठला... महाशतकांच्या शतकवीराला झी २४ तास कडून मानाचा मुजरा!!!!

 

सचिनने बांग्लादेशविरूद्ध शतक ठोकत सगळ्यांचा डोळ्याचे पारणे फेडले, सचिन आज शतक करणार की नाही याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. वनडे आणि टेस्ट मिळून सचिनने १०० शतकांचा असा पल्ला गाठला. शतकांचा शतकवीर अशी बिरूदावली आज त्याला खऱ्या अर्थाने शोभते आहे. गेले वर्षभर तो एकही शतक करू शकला नव्हता, त्यामुळे त्याच्यावर टीका केली जात होती मात्र आज त्याने आपल्या बॅटने सगळ्यांच्या टीकेला उत्तर दिले आहे..

 

सचिन तेंडुलकरने आजवर अनेक विश्वविक्रम आपल्या नावावर केले मात्र महाशतकाचा विश्वविक्रम त्याला गेले वर्षभर हुलकावणी देत होता. गेल्या वर्षी खेळलेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात त्याने द. आफ्रिकेविरूद्ध शतक केलं होतं ते त्याचं ९९वं शतक होतं. १२ मार्च २०११ला सचिनने शेवटची सेंच्युरी केली होती.

 

सचिनने आज अगदी सथंपणे खेळाला सुरवात केली. गंभीर झटपट आऊट झाल्याने सचिनने आपल्या फटक्याना आवर घालत आपला खेळ हळूहळू पुढे नेला, त्याने गेल्या २० वर्षाचा अनुभव पणाला लावीत आपली शंभरावी सेंच्युरी पूर्ण केली. त्याने १३८ बॉलमध्ये १०० रन केले. पण त्यानंतरही त्याने आपला खेळ पुढे चालूच ठेवला. तो ११४ रन करून परतला, त्यात १२ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता....  १०० शतकं करून त्याने त्याच्या करोडो चाहत्यांची मनोकामना पूर्ण केली.

 

 

महाशतकाकडे सचिनने वाटचाल केलेली आहे. सचिनने ११५ बॉलचा सामना करीत ८३ रनपर्यंत मजल मारली आहे, सचिनची ही ४६२ वी वन-डे मॅच आहे. आणि ४५१ इनिंग आहे. आज जर सचिनने शतक पूर्ण केल्यास तो महाशतकांचा टप्पा गाठणारा जगातील एकमेव फंलदाज ठरणार आहे, आणि हा एक आगळावेगळा असा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाणार आहे.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

टॉस जिंकून प्रथम बॅटींगसाठी आलेल्या इंडियन टीमची सुरवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. गंभीर जो गेल्या मॅचचा हिरो ठरला होता, तो या मॅचमध्ये जास्त चमकदार कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे सुरवातीलाच विकेट गेल्याने टीमची सुरवात मात्र संथ झाली.

 

पण आज सगळ्यांचेच लक्ष सचिनच्या महाशतकाकडे लागून राहिलेलं आहे. त्यातच सचिनला आज लय सापडल्यामुळे तो विकेटवर चांगला जम बसल्यासारखा खेळत आहे. आणि त्याने आपलं अर्धशतक देखील पूर्ण केलं आहे  आता तो आपलं शतक पूर्ण करून महाशतकांचा टप्पा गाठणार का? याचीच सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

 

सचिनने गेल्या वर्षभरात शतक केलेलं नसल्याने आज शतक करून शतकांचा वनवास संपवावा अशीच साऱ्यांची इच्छा आहे. सचिनसोबत आलेला विराट कोहली हा देखील चांगलाच फॉर्मात आहे. आणि त्याने देखील अर्धशतकाकडे वाटचाल सुरू केली आहे.

 

एशिया कपमध्ये भारताने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून भारताने पहिली बॅटींग घेतली आहे. सचिन महाशतक आज करणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसंच बांग्लादेश सोबत असणऱ्या थोड्या सोप्या मॅचमध्ये शतक करण्यासाठी सचिनही नक्कीच तयार असेल. भारतीय टीममध्ये आज दोन बदल करण्यात आले आहेत. रविंद्र जडेजा आणि अशोक डिंडा यांना बांग्लादेश विरूद्ध संधी देण्यात आली आहे.

 

इंडिया : 138/1 (ओव्हर 27.0)

बांग्लादेश : 0/0 (ओव्हर 0.0)

सचिन तेंडुलकर - 73 (92)