मी सचिनला केलं निवृत्त, पाक क्रिकेटरचा दावा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या कारकिर्दीतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात मी त्याला बाद केल्यानेच सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा, अजब दावा पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल याने केला आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Aug 24, 2013, 03:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,लंडन
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या कारकिर्दीतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात मी त्याला बाद केल्यानेच सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा, अजब दावा पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल याने केला आहे.
पाकिस्तानचा ऑफ-स्पिनर सईद अजमलने सचिन तेंडुलकरबाबत विनोद केलाय. हा विनोद क्रिकेटरसिकांचा रोषामुळे अंगलट आला आहे. ‘विस्डेन इंडिया’ला दिलेल्या ताज्या मुलाखतीमध्ये अजमलने असे म्हटले आहे की, गेल्या वर्षी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत मी सचिनला बाद करून एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीसाठी प्रवृत्त केलेय.
२०१२मध्ये ढाक्याच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेत सामना झाला होता. ४८ चेंडूंत ५२ धावांची खेळी साकारणाऱ्या सचिनला त्या सामन्यात अजमलनेच तंबूच वाट दाखवली होती. तो सामना भारताने सहा विकेट आणि १३ चेंडू राखून जिंकला होता. परंतु सचिनने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने सचिनची एकदिवसीय कारकीर्दीतील तो अखेरचा सामना ठरला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.