ट्राय सीरिज फायनल : भारत विरुद्ध श्रीलंका

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, July 11, 2013 - 10:44

www.24taas.com, झी मीडिया, पोर्ट ऑफ स्पेन
ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये आज भारताचा मुकाबला होणार आहे ते श्रीलंकेशी... फायनलमध्ये कॅप्टन धोनी खेळण्याची शक्यता असल्यानं त्याचा फायदा टीम इंडियाला मिळणार आहे तर चॅम्पियन्सना पराभूत करून ट्राय सीरिजचं अजिंक्यपद करण्याचा इराद्यानं लंकन टीम मैदानात उतरणार आहे.
ट्राय सीरिजमध्ये ‘डू ऑर डाय’ लढतीत विराटच्या नेतृत्वात भारतानं लंकेवर दणदणीत विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली. आता फायनलमध्येही भारतासमोर आव्हान असणार आहे ते पुन्हा श्रीलंकेचच... दुखापतग्रस्त महेंद्रसिंग धोनी श्रीलंकेविरुद्धच्या फायनलमध्ये खेळण्याची शक्यता असल्यानं टीम इंडियाचं मनोधैर्य उंचावलंय तर लंकनं टीमही पराभवाचा वचपा काढण्यासाठी आतूर आहे.

फायनलमध्ये शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या युवा शिलेदारांकडून भारताला मोठ्या खेळीची अपेक्षा असणार तर भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि ईशांत शर्मा या त्रिकुटाला लंकेनं बॅट्समनला रोखण्याचं आव्हान असेल.
लंकेची बॅटिंग ऑर्डरही चांगलीच मजबूत आहे. अनुभवी कुमार संगकारा, महेला जयवर्धने आणि उपुला थरंगा भारतासाठी धोकादायक ठरू शकतात. भारतीय टीममधील युवा प्लेअर्सनी या स्पर्धेत चांगलीच छाप सोडलीय. मात्र, फायनलमध्ये लंकेच्या अनुभवी प्लेअर्सविरुद्ध त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. कॅरेबियन बेटांवर होत असलेल्या दोन एशियन टीम्समधील हा फायनल फाईट चांगलीच रंगतदार होण्याची चिन्ह आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 11, 2013 - 10:05
comments powered by Disqus