अंडर-१९ विश्वविजयी टीम विजयी थाटात परतली

या यंग इंडियाचा आज मुंबईत बीसीसीआयतर्फे सन्मान केला जाणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता एका कार्यक्रमात विश्वविजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.

Updated: Aug 28, 2012, 04:12 PM IST

www.24taas.com, मुंबई
अंडर-१९ विश्वचषक जिंकून चमकदार कामगिरी करणाऱ्या चांद च्या टीमचं आज मायदेशात आगमन झालं आहे. उन्मुक्त चांदच्या नेतृत्त्वाखालील युवा संघानं भारताला अंडर नाईन्टीन विश्वचषकातलं तिसरं जेतेपद मिळवून दिलं आहे.
या यंग इंडियाचा आज मुंबईत बीसीसीआयतर्फे सन्मान केला जाणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता एका कार्यक्रमात विश्वविजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.
बोर्डानं याआधीच विश्वविजेत्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी २० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. टीमच्या सपोर्ट स्टाफलाही प्रत्येकी १५ लाखांचं बक्षीस मिळणार आहे. रविवारी २६ ऑगस्टला झालेल्या फायनलमध्ये भारतानं यजमान ऑस्ट्रेलियाला धूळ चारली होती.