माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी लीलावतीत

By Surendra Gangan | Last Updated: Friday, November 29, 2013 - 12:48

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
विनोद कांबळी घरी परतत असताना त्याच्या छातीत वेदना जाणवू लागल्या. विनोद स्वत: गाडी चालवत होता. छातीत वेदना होत असल्याने गाडी थांबविली. याच दरम्यान, वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षक सुजाता पाटील यांचे लक्ष गेले. त्यांनी तात्काळ हालचाल करून विनोदला लीलावतीत हलविले.
पोलीस अधिकारी सुजाता पाटील यांनी विनोद कांबळीला मदत केल्याने वेळेवर उपचार होऊ शकलेत. विनोद आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास चेंबूरवरून वांद्र्याला घरी जात होता. गाडी चालवत असताना अचानक छातीत कळा येऊ लागल्या. त्यावेऴी पेट्रोलिंगवर असलेल्या माटुंगा वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक पाटील यांची नजर विनोद कांबळीच्या गाडीवर पडली. त्यांनी तात्काळ त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 29, 2013 - 12:48
comments powered by Disqus