विराट कोहलीने करुन दाखवलं...सचिनला पडला भारी

स्वबळावर नवनविन रेकॉर्ड बनवणारा भारतीय फलंदाज विराट कोहली भविष्यातील एक महान खेळाडू असेल, असं म्हटलं जातयं. अलिकडेच कपिल देवने तर विराट हा महान खेळाडू सचिन तेंडुलकरचेही रेकॉर्ड तोडू शकेल असं म्हटलं होतं. क्रिक्रेटच्या मैदानावर सचिनच्या रेकॉर्डपासून दूर असलेला कोहलीने मैदानाबाहेर सचिनचे रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केलंय.

Updated: Apr 3, 2014, 05:17 PM IST

www.zee24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
स्वबळावर नवनविन रेकॉर्ड बनवणारा भारतीय फलंदाज विराट कोहली भविष्यातील एक महान खेळाडू असेल, असं म्हटलं जातयं. अलिकडेच कपिल देवने तर विराट हा महान खेळाडू सचिन तेंडुलकरचेही रेकॉर्ड तोडू शकेल असं म्हटलं होतं. क्रिक्रेटच्या मैदानावर सचिनच्या रेकॉर्डपासून दूर असलेला कोहलीने मैदानाबाहेर सचिनचे रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केलंय.
कोहलीने जाहिरातीच्या बाबतीत सचिनलाही मागे टाकलंय. दिल्लीच्या या धुवाधार खेळाडूचं जाहिरातीमध्ये गेल्या सहा महिन्यांत ४० टक्क्यांनी वाढ झालीय. देशातील टॉप १० क्रीडा सेलेंब्रिटीत कोहलीने सचिनला चक्क मागे टाकलंय.
गेल्यावर्षी दिल्लीतील कोहली टी.व्ही.वरील जाहिरातीमध्ये टॉप १० खेळाडूच्या यादीत अव्वल स्थानावर होता. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर हे आहेत. मात्र याआधी गेल्या दोन वर्षांपासून सचिन दोघांपेक्षा वरच्या स्थानावर होता.
कोहलीने जर्मन स्पोर्ट्स कंपनीसाठी १० कोटीचा करार साईन केला आहे. आता तो बॉलिवूड कलाकरांना पण जबरदस्त टक्कर देणार आहे. २५ वर्षीय कोलहीने गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगलीच तरक्की केलीय. २०१२ मध्ये कोहली दरवर्षी एका जाहिरातीसाठी ३ कोटी रुपये घ्यायचा. मात्र आता ६ कोटी रुपये घेतो. १२ ब्रॉडसाठी कोहली जाहिरात करत असून, मागच्या वर्षी ही संख्या १५ होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.