डॅनियलच्या मागणीला विराटच्या आईचं उत्तर...

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, April 8, 2014 - 15:44

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नुकतंच, इंग्लंडची ऑलराऊंडर प्लेअर डॅनियल वेट हिनं भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याला सोशल वेबसाईटवर प्रपोज करून लग्नाची घातली होती. या मागणीला विराटने तर अजून काहीही उत्तर दिलेलं नाही. मात्र, विराटच्या आईने तिच्या या मागणीला उत्तर दिलंय.
विराटची आई सरोज कोहली यांनी, `विराट अजून लहान आहे... त्याच्या लग्नासाठी घाई केली जाणार नाही` असं उत्तर डॅनियलला दिलंय.
विराट कोहली टीम इंडियाबरोबर सेमी फायनलचा विजयोत्सव साजरा करत होता, त्यावेळी डॅनियल वेटने ट्विट करुन चक्क लग्नाच प्रस्तावच ठेवला. `कोहली माझ्याशी लग्न कर!` असं डॅनियलनं म्हणत विराटवरचं आपलं प्रेम जगजाहीर केलं होतं. यावर `विराट दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात आहे` अशी एकानं प्रतिक्रियाही यावर लगेचच देऊन टाकली होती.
पण, काहीही असो विराटशी लग्न करण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना विराटच्या आईनं मात्र इथंच थोपवलंय. आता, पाहुयात अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि खुद्द विराटची यावर काय प्रतिक्रिया असेल ते...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 8, 2014 - 15:44
comments powered by Disqus