सुश्मिता सेनशी नाही, ऑसी ललनेशी अक्रमचे लग्न!

By Prashant Jadhav | Last Updated: Monday, July 8, 2013 - 16:13

www.24taas.com, झी मीडिया, मेलबर्न
वसीम अक्रम आणि सुश्मिता सेन यांचे सूत जुळले आणि ते लग्न करणार अशा अफवा गेल्या काही महिन्यांपूर्वी पसरल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांना फाटा देत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमने रिव्हर्स स्वींग टाकला आहे.
आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीत भल्या भल्यांची यॉर्करने दांडी उडवणारा अक्रम ऑस्ट्रेलियन ब्युटी शनैरा थॉमसनच्या सौंदर्याच्या यॉर्करवर क्लिन बोल्ड झाला आहे. अक्रम शनैराशी लग्न करणार असल्याने अभिनेत्री सुष्मिता सेन हीच्याबरोबर असलेल्या अफेअरची चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
अक्रमच्या पहिल्या पत्नीचं २००९ मध्ये निधन झालं आहे. तिच्यापासून त्याला दोन मुलंही आहेत. त्यामुळे त्याचे आणि सुश्मिताचे अफेअर असल्याची चर्चा होती. शनैरा थॉमसन ( वय ३०) या ऑस्ट्रेलियन बालेवर फिदा होत अक्रम (४७)ने तिला प्रपोज केलं. आपल्या जीवनातील हा अत्यंत रोमँटिक क्षण होता, असे अक्रमच्या प्रपोजलनंतर शनैराने सांगितले.
अक्रम आपल्यावर मनापासून प्रेम करतो त्यात दिखावा नाही, असं शनैरा म्हणाली. तर आपण पुन्हा प्रेमात पडू असं कधी वाटलं नव्हतं, असे शनैराच्या प्रेमात पडलेला अक्रम म्हणाला.
अक्रम आणि शनैरा हे २०११ मध्ये मेलबर्नला पहिल्यांदा भेटले होते. शेनेरा ही पब्लिक कन्सलटंट आहे. लग्ननांतर ती मुस्मीम धर्म स्वीकारणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 8, 2013 - 16:13
comments powered by Disqus