सचिनच्या निवृत्तीनंतर त्याचे रेकॉर्डस् तोडण्याची जॅकला संधी...

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॅक कॅलिसन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज झालाय. नुकत्याच निवृत्ती जाहीर केलेल्या सचिनचे विक्रम जॅक तोडू शकेल का? ही उत्सुकता आता जॅक आणि सचिनच्या चाहत्यांना लागलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 3, 2013, 11:56 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू जॅक कॅलिस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज झालाय. नुकत्याच निवृत्ती जाहीर केलेल्या सचिनचे विक्रम जॅक तोडू शकेल का? ही उत्सुकता आता जॅक आणि सचिनच्या चाहत्यांना लागलीय.
आफ्रिकेविरूध्द सचिनच्या सर्वाधिक रन्स, सर्वाधिक सेन्चुरी आणि ५० रन्सहून अधिक खेळी हे सचिनचे तीन विक्रम मोडण्याची संधी लवकरच जॅकला मिळतेय. १८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यात जॅकला ही संधी मिळतेय.
भारत आणि आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या २५ कसोटी सामन्यात सचिनने सर्वाधिक १७४२ धावा केल्या आहेत तर कॅलिसने भारताविरूध्द १६ सामन्यात १५८५ धावा केल्या आहेत. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी कॅलिसला केवळ १५६ धावा करायच्या आहेत.
प्रतिस्पर्धी संघ आफ्रिकेविरूध्द सर्वाधिक सात सेन्चुरी झळकाविण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे तर कॅलिसच्या नावावर सहा सेन्चुरी असून त्याला सचिनची बरोबरी करायला केवळ एका सेन्चुरीची गरज आहे.
तसंच सचिने आफ्रिकेविरूध्द खेळताना सर्वाधिक १२ वेळा ५० हून अधिक धावा करीत खेळी साकारली आहे तर कॅलिसने भारताविरूध्द ११ वेळा अशी किमया केली आहे. त्याला हा विक्रम मोडण्यासाठी केवळ एकदाच अशी खेळी करायची आहे. असं असलं तरी सचिन आणि जॅकच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीच्या तुलनेत कॅलिस सचिनच्या खूपच मागे आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.