युसूफ-अफरीनवर `निकाहा`चा रंग...

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, March 28, 2013 - 15:07

www.24taas.com, मुंबई
भारतीय टीममधून सध्या बाहेर असेल तर युसूफ पठाणचं आयुष्य आता वेगळं वळण घेतंय... नुकताच तो लग्नाच्या बेडीत अडकलाय.
बुधवारी अनेक जण होळीच्या रंगात रंगलेले असताना युसूफ आणि अफरीनवर लग्नाचा रंग चढलेला होता. मुंबईमध्ये झालेल्या एका कौटुंबिक सोहळ्यात यूसूफनं अफरीनसोबत निकाहची वचनं घेतली. दोन्ही परिवारांच्या सहमतीनं हा विवाह पार पडलाय.
गेल्या वर्षी या ३० वर्षीय क्रिकेटरनं नादियाडमध्ये एका खाजगी सोहळ्यात युसूफ-अफरीनचा साखरपुडा पार पाडला होता. अफरीन ही मुंबईत लहानाची मोठी झालीय पण सध्या ती वडोदरामध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम पाहतेय.

गेल्या काही काळापासून भारतीय टीममधून बाहेरच असलेल्या पठाननं आत्तापर्यंत ५७ वन डे खेळल्यात. यामध्ये त्यानं १३६५ रन्स केलेत. तसंच त्यानं २२ टी-२० मध्ये ४३८ रन्स केलेत.

First Published: Thursday, March 28, 2013 - 10:25
comments powered by Disqus